टी-२० विश्वचषकासाठी धोनी फायदेशीर ठरु शकतो – सुरेश रैना

धोनी अजुनही सर्वोत्तम क्रिकेटपटू !

महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुन्हा एकदा पुनरागमन करणार याबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता आहे. विश्वचषकानंतर निवड समितीने ऋषभ पंतला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता, पहिली पसंती दर्शवली होती. मात्र ऋषभ पंतने विंडीज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फलंदाजीमध्ये पुरती निराशा केली. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियात धोनीला पुन्हा संघात स्थान द्या अशी मागणी होत होती. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही धोनी आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनी फायदेशीर ठरु शकतो असं वक्तव्य केलं आहे.

“निवृत्ती कधी घ्यायची हा निर्णय फक्त धोनीच घेईल. धोनी अजुनही फिट आहे, तो सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. आजही तो सर्वोत्कृष्ट फिनीशर म्हणून ओळखला जातो. आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघासाठी फायदेशीर ठरु शकतो.” ‘द हिंदू’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रैना बोलत होता.

अवश्य वाचा – टीम इंडियात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी सुरेश रैनाही शर्यतीमध्ये

काही दिवसांपूर्वी धोनीने आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवर जात असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे धोनी भारतीय संघात खेळत नाहीये. त्यामुळे आगामी काळात धोनीच्या भारतीय संघातील स्थानाबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ SOURCE