विश्वचषक सुरू होण्याआधी टीम इंडियाचा कॅप्टनकूल धोनीला आनंदाची बातमी मिळाली आहे. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. गुडगावमधील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी साक्षीने मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे, बाळंतपणाच्या निर्धारित तारखेच्या महिनाभरआधीच धोनीच्या घरी चिमुकली पाहुणी दाखल झाली आहे. धोनी विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात असल्यामुळे रुग्णालयात साक्षीची काळजी धोनीचे कुटुंबिय घेत असून धोनीला दूरध्वनीद्वारे आनंदाची बातमी कळविण्यात आल्याचे धोनी कुटुंबियांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.