News Flash

VIDEO: धोनीचा ‘मास्टर प्लॅन’, कुलदीपची फिरकी अन् अलगद जाळ्यात अडकलेला बोल्ट

धोनीने दिलेला सल्ला स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड

धोनीचा 'मास्टर प्लॅन'

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे भारतीय संघातील महत्व न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या समान्यात पुन्हा दिसून आले. धोनीचा अनुभव संघासाठी कसा फायद्याचा ठरु शकतो हे स्टम्प माईकमधून पुन्हा एकदा समजले. नेपियर येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाला अवघ्या १५७ गुंडळाण्यात भारतीय फिरकी गोलंदाजांना यश आले. यामध्येही कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांनी मिळून सहा गडी बाद केले. कुलदीपने चार तर चहलने दोन जणांना तंबूत पाठवले. मात्र या दोघांनाही धोनी स्टम्पमागून सतत सूचना करत होता आणि खरोखरच त्याच्या सुचना फायद्याच्या होत्या. धोनीने कुलदीपच्या मदतीने ट्रेंट बोल्टला आपल्या जाळ्यात अडकवून बाद केल्याचे स्टम्प माईकवरून समजते.

झालं असं की ३७ व्या षटकामध्ये ट्रेंट बोल्ट फलंदाजी करत होता. त्यावेळी गोलंदाजी करणाऱ्या कुलदीपने पहिले पाच चेंडू टाकल्यानंतर धोनीने त्याला शेवटचा चेंडू ‘राऊण्ड द विकेट’ म्हणजेच स्टम्पच्या दुसऱ्या बाजूने टाकण्याचा सल्ला दिला. यावेळी ‘हा शेवटचा चेंडू तू कसाही टाकला तरी तो डोळे बंद करुन खेळून काढणार. त्यामुळे तू स्टम्पजवळून राऊड द विकेट चेंडू टाक,’ असा सल्ला धोनीने हिंदीमध्ये कुलदीपला दिला. कुलदीपनेही धोनीचे ऐकत चेंडू अगदी स्टम्पजवळून टाकला पण तो चेंडू आतमध्ये पडून बाहेर वळाला. धोनीच्या अपेक्षेप्रमाणे बोल्ट षटकातील शेवटचा चेंडू खेळून काढायला गेला आणि बॅटची कट लागून चेंडू फर्स्ट स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या रोहित शर्माच्या हातात स्थिरावला. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

धोनीच्या या सल्ल्यानंतर बोल्ट तंबूत परतला आणि नेटकऱ्यांनी धोनीच्या अक्कल हुशारीला दाद दिली.

माही वे

धोनीची हुशारी

आणि तो बाद झाला

तो डोळे बंद करुनच खेळला

भारताकडून कुलदीप यादवने ४ तर मोहम्मद शमीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. या दोघांना युझवेंद्र चहलने २ तर केदार जाधवने १ गडी बाद करत चांगली साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 11:41 am

Web Title: dhonis magic works wonder sets up boults dismissal with kuldeep
Next Stories
1 IND vs NZ : ‘चायनामन’ कुलदीप यादव नेपियरच्या मैदानात चमकला
2 Australian Open : सेरेना विल्यम्स स्पर्धेतून बाहेर
3 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी सचिन तेंडुलकरची बॅटींग
Just Now!
X