भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने, मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या संघात महेंद्रसिंह धोनीचं संघात असणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. धोनी संघात असल्यास तो विराटला निर्णय घेण्यासाठी चांगली मदत करतो. गेल्या काही महिन्यांमध्ये धोनीच्या वन-डे संघातील स्थानावरुन अनेक माजी खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या होत्या. यावर आपलं मत देताना युवराज सिंह बोलत होता.
अवश्य वाचा – IND vs NZ : महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत रोहित शर्मा षटकारांचा बादशहा
“माझ्या मते धोनीकडे क्रिकेटची चांगली जाण आहे. एक यष्टीरक्षक या नात्याने सामन्याचा अंदाज त्याला लगेच येतो. तो एक सर्वोत्तम कर्णधार होता, आणि सध्याच्या घडीला विराट कोहलीसह अनेक तरुण खेळाडूंना त्याचं मार्गदर्शन हे मोलाचं आहे. याचकारणासाठी विश्वचषकासाठी धोनीचं संघात असणं गरजेचं आहे.” युवराजने धोनीला आपला पाठींबा जाहीर केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीने चांगलं पुनरागमन केलं आहे. ज्या पद्धतीने धोनी आधीच्या फलंदाजी करायचा त्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहणं खूप आनंददायी असतं. मात्र धोनीने कोणत्या स्थानावर फलंदाजी करावी, हा निर्णय त्याने आणि संघ व्यवस्थापनाने घ्यायचा असल्याचं युवराजने स्पष्ट केलं.
अवश्य वाचा – इराणी चषकासाठी शेष भारत संघाची घोषणा, अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 9, 2019 7:56 am