सराव तसेच स्पर्धा असे स्वरूप असलेल्या अमेरिकेतील डायमंड लीग स्पर्धेत थाळीफेक प्रकारात कृष्णा पुनियाने तिसरे स्थान मिळवले. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र होण्याचा निकष ती पूर्ण करू शकली नाही. माजी राष्ट्रकुल पदकविजेत्या पुनियाने ५८.२६ मीटर अंतरावर थाळी फेकली. राष्ट्रकुलसाठी आवश्यक निकष असलेल्या ५८.४६ मीटर अंतरापेक्षा हे कमी आहे.
दरम्यान, पुरुष गटात राष्ट्रीय विजेता आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पदकासाठी शर्यतीत असलेल्या विकास गौडाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने ६१.४९ मीटर अंतरावर थाळी फेकली.