क्रिकेट हा खूपच लोकप्रिय खेळ आहे. जगभरातील काही निवडक देश क्रिकेट खेळत असले, तरी क्रिकेटचा इतर देशांत प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून केले जात आहेत. मात्र पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना केव्हा आणि कोणाच्यात खेळला गेला होता हे माहिती आहे काय? … सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसे ओळख नसलेले दोन देश यांच्यात पहिलावहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आला.

CoronaVirus : रोहित शर्माने पोस्ट केला खास VIDEO, म्हणाला…

२६ ते २६ सप्टेंबर १८४४ साली जगातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना मॅनहॅटन येथे खेळवण्यात आला. अमेरिका विरूद्ध कॅनडा असा हा सामना रंगला होता. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय सामन्यात कॅनडाच्या संघाने २३ धावांनी विजय मिळवला होता.

pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले

Video : “कब्र बनेगी तेरी…”; गेलचा हिंदी डायलॉग ऐकून तुम्हालाही आवरणार नाही हसू

अमेरिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सामन्याच्या पहिल्या डावात कॅनडाने फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड विंकवर्थ, मधल्या फळीतील जॉर्ज शार्प आणि तळाचा फलंदाज फ्रिलींग यांनी प्रत्येकी सर्वाधिक १२ धावा केल्या होत्या. त्या बळावर कॅनडाने पहिल्या डावात सर्वबाद ८२ धावा केल्या होत्या.

Bundesliga Chess : विश्वनाथन आनंदला CoronaVirus चा फटका

सामन्याच्या दुसऱ्या डावात अमेरिकेला सर्वबाद ६४ धावा करता आल्या होत्या. त्यात मधल्या फळीतील रॉबर्ट टिनसन याने सर्वाधिक १४ धावा केल्या होत्या. त्यानंतर कॅनडाचा दुसरा डाव ६४ धावांत आटोपला होता. त्यात डेव्हिड विंकवर्थने सर्वाधिक १४ धावा केल्या होत्या. शेवटच्या डावात मिळालेले ८२ धावांचे आव्हान अमेरिकेला पेलवले नाही. शार्पच्या ६ बळींच्या जोरावर कॅनडाने अमेरिकेला ५८ धावांवरच रोखले.

Video : १२ चौकार, ८ षटकार… पाहा ख्रिस लीनचं तुफानी शतक

या सामन्यात कॅनडाचे जॉन कोनोली, अमेरिकेचे हॅरी रसल आणि रॉबर्ट वॉलर यांनी पंच म्हणून काम पाहिले.