१९८६ सालच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात आपल्या दोन गोलच्या आधारावार अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून देणारे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं बुधवारी निधन झालं. वयाच्या ६० व्या वर्षी मॅरेडोना यांना आपल्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या बहारदार खेळामुळे अर्जेंटिना आणि जगभरातील लाखो खेळाडूंना फुटबॉलची गोडी लावणाऱ्या मॅरेडोना यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

मॅरेडोना यांच्यानंतर त्यांचा वारसा अर्जेंटिनाकडून पुढे चालवणारा विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेसीनेही मॅरेडोना यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “अर्जेंटिना आणि फुटबॉलसाठी ही सर्वात वाईट बातमी आहे. ते आपल्याला सोडून गेलेत पण ते फार दूर गेले नाहीत याची मला खात्री आहे. कारण ते अमर आहेत. त्यांच्या परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची ताकद मिळो…अशा आशायचा मेसेज मेसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहीला आहे.

आणखी वाचा- …आणि मॅरेडोना यांचा तो गोल ‘Hands of God’ म्हणून प्रसिद्ध झाला

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi)

आणखी वाचा- ‘एक दिवस आम्ही दोघं वर एकत्र फुटबॉल खेळू’, मॅरेडोना यांच्या निधनानंतर पेले यांची भावनिक प्रतिक्रिया

२००८ ते २०१० या काळात दिएगो मॅरेडोना अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होते. या काळात मेसी मॅरेडोना यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला. ड्रग्ज सेवन, दारु याच्यामुळे बराच काळ फुटबॉलपासून दुरावलेल्या मॅरेडोना यांचं ते यशस्वी पुनरागमन मानलं जात होतं. मेसी वयाच्या १८ व्या वर्षी मॅरेडोना यांच्यासोबत एका प्रदर्शनीय सामन्यात खेळला होता, यावेळी मॅरेडोना यांचं वय ४५ वर्ष होतं.