वेस्टइंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा वेगवान गोलंदाज अबुल हसनने पदार्पणाच्या कसोटीत दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकावण्याचा अनोखा विक्रम नावावर केला. कसोटी क्रिकेटच्या १३५ वर्षांच्या इतिहासात हा विक्रम करणारा अबुल केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.  फिडेल एडवर्ड्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांची ८ बाद १९३ अशी अवस्था झाली होती. मात्र यानंतर अबुल हसन आणि महमदुल्लाह यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद १७२ धावा जोडल्या.अबघुलने पहिल्याच घकसोटीत शतक पूर्ण केले. २० वर्षीय अबुलने १३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १०० धावा फटकावल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या ८ बाद ३६५ झाल्या आहेत.