भुवनेश्वरला पुढील महिन्यात होणाऱ्या हॉकी प्रो लीगसाठी शनिवारी निवडण्यात आलेल्या ३२ संभाव्य खेळाडूंमध्ये युवा आक्रमक दिलप्रीत सिंगचे पुनरागमन झाले आहे.

मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांच्या मार्गदर्शनाखाली कलिंगा हॉकी स्टेडियमवर होणाऱ्या दोन आठवडय़ांच्या विशेष शिबिरासाठी या खेळाडूंची निवड झाली आहे. प्रो लीगमध्ये १८ आणि १९ जानेवारीला भारताचे नेदरलँड्सविरुद्ध सामने होणार आहेत. शिलानंद लाक्रा, राजकुमार पाल, निलम संजीप सेस आणि दीपसान तिर्की यांचाही भारताच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.