X

Asia Cup 2018 : श्रीलंकेला धक्का, कर्णधार दिनेश चंडीमल दुखापतीमुळे संघाबाहेर

निरोशन डीकवेलाला संघात स्थान

अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या आशिया चषकाआधीच श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार दिनेश चंडीमल बोटाला झालेल्या दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाहीये. चंडीमलच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाला संघात स्थान मिळालं आहे.

आशिया चषकासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. स्थानिक टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेत खेळत असताना चंडीमलच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत अजुनही बरी झाली नसल्याने अनुभवी अँजलो मॅथ्यूज संघाचा कर्णधार म्हणून काम पाहणार आहे.

आशिया चषकासाठी असा असेल श्रीलंकेचा संघ –

अँजलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल पेरेरा, कुशल मेंडीस, उपुल थरंगा, निरोशन डिकवेला, दनुष्का गुणतिलका, थिसारा पेरेरा, दसुन शनका, धनंजय डी-सिल्वा, अकिला धनंजया, दिलरुवान पेरेरा, अमिला अपोन्सो, कसुन रजिथा, सुरंगा लमकल, दुष्मंता चमिरा, लसिथ मलिंगा.

  • Tags: dinesh-chandimal, sri-lanka, आशिया कप - 2018,