News Flash

दीपिका पल्लिकल उपांत्य फेरीत

मागील लढतीपेक्षा सलमाने मला अधिक चांगली लढत दिली. पहिला गेम रंगतदार झाला.

| January 22, 2016 12:04 am

भारताच्या दीपिका पल्लिकलने इजिप्तच्या सलमा हनी इब्राहिमवर दणदणीत विजय मिळवीत ग्रेनाइट खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर असलेल्या दीपिकाने सलमाचा
१२-१०, ११-२, ११-४ असा पराभव केला.
‘‘मागील लढतीपेक्षा सलमाने मला अधिक चांगली लढत दिली. पहिला गेम रंगतदार झाला. ७-१० अशा पिछाडीनंतरही मी तू जिंकून दाखवला. त्यामुळे आत्मविश्वास अधिक दुणावल्याने पुढील दोन गेममध्ये मला वर्चस्व राखता आले. सलमा ही बुद्धिमान खेळाडू असल्याने या विजयामुळे मला अतिशय आनंद झाला,’’ असे दीपिकाने सामन्यानंतर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 12:04 am

Web Title: dipika pallikal powers into semi finals
टॅग : Dipika Pallikal
Next Stories
1 महिलांच्या प्रो-कबड्डीसाठी अभिषेक उत्सुक
2 संघातून काहींना वगळण्याची वेळ आली, गावसकरांनी टीम इंडियाला सुनावले
3 फेडरर, जोकोव्हिचची आगेकूच
Just Now!
X