News Flash

FIFA World Cup (2022) Qualifier स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाची निराशाजनक कामगिरी

भारत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकपमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं आहे.

फिफा विश्वचषक २०२२ पात्रता फेरीत भारत स्वत:ला सिद्ध करण्यास अपयशी ठरला आहे. (Photo- indian express)

फुटबॉल हा यूरोपियन देशात सर्वात लोकप्रिय खेळ आहे. यूरो चषक आणि फिफा वर्ल्डकप म्हटलं की फुटबॉल चाहते अगदी वेडे होतात. भारतातही फुटबॉलचे चाहते आहेत. मात्र क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉलची लोकप्रियता कमी आहे. असं असलं तरी कोट्यवधी भारतीयांची भारतीय संघ फिफा वर्ल्डकपमध्ये खेळताना बघण्याची इच्छा आहे. मात्र फुटबॉल वर्ल्डकप येतो आणि आपला संघ का नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. या स्पर्धेत पात्र होण्यासाठी फिफा पात्रता स्पर्धेचं आयोजन करते. जो संघ ही दिव्य परीक्षा पास करतो त्या संघाला फिफा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळते. सध्या फिफा वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी सुरु आहे. या पात्रता फेरीनंतर फिफा वर्ल्डकपसाठी देशांची निवड केली जाते. पात्रता स्पर्धेत आशियाई देशातील संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

पात्रता फेरीत भारताची कामगिरी

  • पात्रता फेरीतील भारताचा पहिला सामना ओमनसोबत होता. ५ सप्टेंबर २०१९ रोजी हा सामना झाला. या सामन्यात ओमननं भारतात २-१ ने पराभूत केलं.
  • भारताचा दुसरा सामना कतारसोबत १० सप्टेंबर २०१९ रोजी पार पडला. हा सामना अनिर्णित ठरला.
  • १५ ऑक्टोबर २१९ रोजी बांगलादेशसोबत झालेला सामनाही बरोबरीत सुटला. दोन्ही संघाच्या नावावर प्रत्येकी १-१ गोल नोंदवला गेला.
  • १४ नोव्हेंबर २०१९ रोजी आफगाणिस्तानसोबत झालेला सामनाही बरोबरीत सुटला. दोन्ही संघाच्या नावावर प्रत्येकी एक गोल नोंदवला गेला.
  • १९ नोव्हेबर २०१९ रोजी ओमनसोबत झालेला सामना भारताने गमावला. ओमनने भारतावर १-० ने विजय मिळवला. त्यानंतर करोनामुळे काही काळ स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या.
  • ३ जून २०२१ रोजी भारताचा सामना कतारसोबत झाला. या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. कतारने भारताला १-० ने पराभूत केले
  • ७ जून २०२१ रोजी भारताचा पात्रता फेरीतील सामना बांगलादेशसोबत पार पडला. हा सामना भारताने २-० ने जिंकला.

UEFA Euro Cup फुटबॉलचा इतिहास; ६० वर्षात झाले इतके बदल

भारत पात्रता फेरीत स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकपमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं आहे. ३६ वर्षीय छेत्रीने बांगलादेशविरुद्धच्या फिफा विश्वचषकातील पात्रता लढतीत भारताला २-० असा विजय मिळवून दिला. ‘‘मी निवृत्तीचा विचार करत नाही. सध्या मी फुटबॉलचा पुरेपूर आनंद लुटत आहे. पूर्वीपेक्षा मी तंदुरुस्त आहे. वय वाढत असले तरी देशासाठी खेळण्याची आणि गोल करण्याची भूक कायम आहे,’’ असेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 4:42 pm

Web Title: disappointing performance of the indian football team in the fifa world cup 2022 qualifier rmt 84
टॅग : Fifa World Cup,Football
Next Stories
1 पाकिस्तान सुपर लीगमध्ये राशिद खानच्या फिरकीची जादू!; २० धावा देत ५ गडी केले बाद
2 UEFA Euro Cup युरोपात सत्ता कुणाची?
3 WTC Final: विराटच्या डोकेदुखीवर हरभजनाचा रामबाण उपाय!; म्हणाला…
Just Now!
X