News Flash

रिजिजू-बत्रा यांच्यात बैठकीदरम्यान मतभेद

रागाच्या भरात रिजिजू यांनी बैठक अर्धवटच सोडल्याचे वृत्तही एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्यात मंगळवारी ऑनलाइन बैठकीदरम्यान मतभेद झाल्याचे निदर्शनास आले. रागाच्या भरात रिजिजू यांनी बैठक अर्धवटच सोडल्याचे वृत्तही एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंच्या सज्जतेचा आढावा घेण्यासंबंधी या उच्चस्तरीय ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘‘करोनामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे काही क्रीडापटूंना ऑलिम्पिकमधील स्थान पक्के करता आले नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत अन्य पर्यायाचा विचार करण्यासाठी ‘आयओए’वर दडपण टाकावे. संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे,’’ असे रिजिजू म्हणाले. मात्र बत्रा म्हणाले की, ‘‘मी सर्व क्रीडा संघटनांशी थेट संपर्कात असल्यामुळे गैरसमजुतीचा प्रश्न उद्भवणार नाही.’’ परंतु आपल्या विधानाचा बत्रा यांनी चुकीचा अर्थ घेतल्याचे म्हणत रिजिजू यांनी बैठक अर्धवट सोडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:36 am

Web Title: dispute between union sports minister kiren rijiju and ioa president narinder batra zws 70
Next Stories
1 Australian ball-tampering scandal : बँक्रॉफ्टचे घूमजाव!
2 तौक्ते वादळात वानखेडे स्टेडियमचे नुकसान
3 सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Just Now!
X