जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा :- ठाणे येथील श्री मावळी मंडळातर्फे आयोजित ३१व्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय कारभारी ‘मावळी मंडळ-श्री’ किताबाचा मानकरी ठरला. कळव्याच्या अपोलो जिमने ४४ गुण मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले, तर भिवंडीच्या युनिव्हर्सल फिजिक्स सेंटरला २० गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शायन कासकरने सवरेत्कृष्ट प्रदर्शकाचा पुरस्कार मिळवला, तर वैभव शिंदे आणि विवेक सिंग यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.’

स्पर्धेतील निकाल

पहिला गट (उंची : १६२ सेंटिमीटरखालील) : १. पुरुषोत्तम बुरोडकर, २. यशवंत जाधव, ३. सिजू कुरियाकोस; दुसरा गट (१६२ ते १६७ सेमी) : १. स्वप्निल वाघमारे, २. शायन कासकर, ३. इजहार अन्सारी; तिसरा गट (१६७ ते १७२ सेमी) : १. अक्षय कारभारी, २. योगेश दिवटणकर, ३. अझहर शेख; चौथा गट (१७२ सेमीवरील) : १. नितेश शेट्टी, २. भूषण पाटील, ३. राजू मढवी.