सोमवारी जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा दिविज शरण ३८ व्या स्थानासह भारतातील अव्वल क्रमांकाचा दुहेरीचा टेनिसपटू ठरला आहे. रोहन बोपन्नाची नऊ स्थानांनी घसरण झाल्याने तो ३९ व्या स्थानी पोहोचला आहे. तर लिएंडर पेस ६० व्या स्थानी असल्याने दिविजला भारतीय टेनिसपटूंमध्ये अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी मिळाली. तर भारताचा दुहेरीतील आणखी एक टेनिसपटू जीवन नेदुचेझियानला ७२ वे स्थान मिळाले असून ते त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च आहे.

‘‘दुहेरीत कारकीर्द गाजवलेल्या बोपण्णा, भूपती आणि पेससारख्या खेळाडूंच्या साथीने मला दुहेरीत वरचे स्थान मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे. दुहेरीतील अव्वल १०० खेळाडूंमध्ये भारताचे सात खेळाडू असणेदेखील भूषणावह आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष सकारात्मक ठरले आहे. माझे आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद हे माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे टप्पे होते. मात्र, अजूनदेखील खूप मेहनत घ्यायची असून अधिक उद्दिष्टे गाठायची आहेत, असे दिविजने नमूद केले. दिविजने यंदा विम्बल्डनच्या दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.