News Flash

Video: DJ Bravo च्या नवीन गाण्यात धोनी-कोहलीचा जयजयकार

नवीन गाण्याचा चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद

वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा मैदानासोबतच त्याच्या गाण्यासाठीही ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी आलेल्या चॅम्पियन…चॅम्पियन गाण्यामुळे ब्राव्होला DJ Bravo अशी नवीन ओळख मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ब्राव्हो पुन्हा एकदा नवीन गाणं घेऊन आपल्या चाहत्यांना भेटायला आलाय.

आशिया या आपल्या नवीन गाण्यामधून ब्राव्होने आशिया खंडातील क्रिकेटपटूंचं कौतुक केलं आहे. श्रीलंका, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या संघातील प्रमुख खेळाडूंना आपल्या गाण्यात स्थान दिलं आहे. भारतीय संघातील विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला ब्राव्होचा आपल्या गाण्यात जयजयकार केला आहे.

ब्राव्होच्या या नवीन गाण्याला सोशल मीडियावर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 9:51 am

Web Title: dj bravo to release new song asia dedicated to virat kohli ms dhoni and other asian stars
Next Stories
1 रणजी करंडक विजेता विदर्भ संघ ठरला करोडपती
2 विश्वचषकासाठी धोनीचं संघात असणं गरजेचं – युवराज सिंह
3 नेमबाज राहीच्या मार्गात सरकारी सेवानियमांचे अडथळे
Just Now!
X