News Flash

जोकोव्हिचला पराभूत करण्याकडे फेडररचे लक्ष

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स या मोसमातील अखेरच्या स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचला पराभूत करण्याचे आणि मोसमातील सातवे जेतेपद

| November 4, 2013 02:46 am

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स या मोसमातील अखेरच्या स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचला पराभूत करण्याचे आणि मोसमातील सातवे जेतेपद पटकावण्याकडे रॉजर फेडररचे लक्ष लागले आहे. हे वर्ष फेडररसाठी कारकिर्दीतील सर्वात वाईट ठरले असून मंगळवारी होणाऱ्या जोकोव्हिचविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.
या मोसमात एकाही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत फेडररला स्थान मिळवता आले नाही. पण गेल्या दोन आठवडय़ात चांगली कामगिरी करत फेडरर फॉर्मात आला आहे. ‘‘जोकोव्हिचविरुद्ध लागोपाठ सामने खेळणे खडतर आहे. पण मी नेहमीच नवनव्या आव्हानांसाठी सज्ज असतो. शारीरिकदृष्टय़ा मी सक्षम असून माझे मनोधैर्य उंचावलेले आहे. आता मोसमाचा शेवट गोड करण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे फेडररने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:46 am

Web Title: djokovic beats federer at paris masters
Next Stories
1 न्यूझीलंडविरुद्ध रोमहर्षक विजयासह बांगलादेशचे मालिकेवर निर्विवाद वर्चस्व
2 विचार धावराशींचे अन् हिशेब धनराशींचे!
3 रोहित रॉकेट सुसाट!
Just Now!
X