रोम : काही दिवसांपूर्वी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिचने इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत रागाच्या भरात आपली रॅके ट तोडली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोव्हिचने जर्मनीच्या डॉमिनिक कोफर याच्यावर ६-३, ४-६, ६-३ असा विजय मिळवला. पण दुसऱ्या सेटमध्ये ३-३ अशी स्थिती असताना जोकोव्हिचने आपली सव्‍‌र्हिस गमावल्यानंतर रॅके ट जोराने जमिनीवर आदळली. त्यामुळे त्याच्या रॅके टचे नुकसान झाले.

बोपण्णा-शापोव्हालोव पराभूत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव यांना इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फे रीत पराभूत व्हावे लागले. बोपण्णा-शापोव्हालोव जोडीवर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या जेरेमी चार्डी आणि फॅ ब्रिस मार्टिन यांनी ६-४, ५-७, ७-१० अशी मात केली.  पाठीच्या दुखापतीमुळे युलिआ पुटिनत्सेव्हाला सामना अर्धवट सोडावा लागल्यामुळे अग्रमानांकित सिमोना हालेपने इटालिन खुल्या टेनिस स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावरील पुटिनत्सेव्हाने सामना सोडला, तेव्हा हालेप ६-२, २-० अशी आघाडीवर होती.