04 March 2021

News Flash

जोकोव्हिच, नदाल, फेडरर यांच्यात जेतेपदासाठी चुरस

महिलांमध्ये सेरेनाला सर्वाधिक पसंती

(संग्रहित छायाचित्र)

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात होत असून यंदा जेतेपदाचा दावेदार ठरवणे कठीण आहे. कारण तिशी ओलांडलेले रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल हे आजही पूर्वीइतकेच वर्चस्व राखून आहेत. या तिघांच्या वर्चस्वाला हे तिघेच आव्हान देत असतात असेच चित्र बघायला मिळाले आहे. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सला वयाच्या ३८व्या वर्षीही जेतेपदाची दावेदार मानण्यात येत आहे.

महिला एकेरीत सेरेनाने २०१७मध्ये ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर ग्रॅँडस्लॅम पटकावलेले नाही. अर्थातच तिचे ते २३वे ग्रॅँडस्लॅम होते. तेव्हापासून झालेल्या विविध ग्रॅँडस्लॅम खुल्या टेनिस स्पर्धामध्ये नऊ महिला विजेत्या बघायला मिळाल्या आहेत. त्यातच सेरेनाने नुकतेच ऑकलंड टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अर्थातच ‘आई’ झाल्यानंतर म्हणजेच तब्बल तीन वर्षांनंतर सेरेनाला जागतिक पातळीवरील टेनिस स्पर्धा जिंकता आली. तिला गतविजेत्या जपानच्या २२ वर्षीय नाओमी ओसाकाचे प्रमुख आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत या दोघींचा सामना होऊ शकेल. ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक मात्र फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे गेल्या वर्षी जेतेपद पटकावणाऱ्या अ‍ॅश्ले बार्टीला प्रोत्साहन देतील.

पुरुष एकेरीत नदाल, जोकोव्हिच, फेडरर या महान खेळाडूंना डॅनिल मेदवेदेव, स्टेफानोस त्सित्सिपास, डॉमिनिक थिएमसारखे युवा खेळाडू आव्हान देतील असे म्हटले जात आहे. स्वत: जोकोव्हिच ही बाब मान्य करतो. ‘‘युवा मंडळी ही वर्चस्व गाजवण्यासाठी आतुर आहेत. ती यशापासून फार दूरही नाहीत,’’ असे जोकोव्हिचने म्हटले.

जोकोव्हिचला विक्रमी आठव्या ऑस्ट्रेलियन जेतेपदाची संधी आहे. नदाल जिंकल्यास त्याला फेडररच्या विक्रमी २० ग्रॅँडस्लॅमशी बरोबरी साधता येणार आहे. मात्र नदाल एकदाच (२००९) ही स्पर्धा जिंकू शकला आहे. फेडरर जिंकला तर त्याला त्याच्या विश्वविक्रमी ग्रॅँडस्लॅमचा आकडा २० वरून २१वर नेता येईल.

* वेळ : पहाटे ५.३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 1:18 am

Web Title: djokovic nadal federer steal for the title abn 97
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अक्षदीपच्या शतकामुळे उत्तर प्रदेश सुस्थितीत
2 Ind vs Aus : शतकवीर ‘हिटमॅन’ची कर्णधार विराटशी बरोबरी
3 Ind vs Aus : ‘कॅप्टन कूल’चा विक्रम आता ‘किंग कोहली’च्या नावावर
Just Now!
X