विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२० साली आपल्या पहिल्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन सुरु असलेल्या निदर्शनांमुळे, रविवारी गुवाहटीच्या सामन्यासाठी विशेष सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मात्र या प्रकरणावर अधिक बोलायला नकार दिला आहे.
अवश्य वाचा – IND vs SL : पहिल्या टी-२० सामन्यात महत्वाचा बदल, जाणून घ्या काय घडलंय…
“पुरेशी माहिती नसताना मी या विषयावर भाष्य केलं तर ते योग्य ठरणार नाही. गुवाहटीत आल्यापासून आतापर्यंत आम्हाला काहीही वावगा प्रकार जाणवला नाही.” CAA च्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला विराटने उत्तर दिलं.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
अवश्य वाचा – Video : दुखापतीनंतर बुमराह सज्ज, भन्नाट यॉर्करने उडवला त्रिफळा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 4, 2020 4:09 pm