News Flash

What a catch : पंतने घेतलेले दोन्ही झेल पाहून तूम्हीही व्हाल हैराण

पाहा व्हिडीओ

चेपॉकच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतनं भन्नाट कामगिरी करत भारताला आघाडी घेण्यात महत्वाचं योगदान दिलं. फलंदाजी करताना विस्फोटक अर्धशतकी खेळी केली. तर क्षेत्ररक्षण करताना दोन अप्रतीम झेल घेत इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झेलणाऱ्या भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवलं. पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत यानं घेतलेल्या झेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आपल्या कमकुवत यष्टिरक्षणाने सतत टीकेचा सामना करणाऱ्या ऋषभ पंतने या दुसऱ्या सामन्यात जबरदस्त झेल घेत इंग्लंड संगाला बॅकफूटवर ढकलण्यात मोलाची भूमिका बजावली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पंतनं अप्रितम झेल टिपला. ३९व्या षटकांतील पहिलाच चेंडू ओली पोपच्या बॅटची कड घेऊन डाव्या बाजूने चालला होता. त्याचवेळी पंत यानं हवेत झेपवत झेल घेतला. चेंडू वेगात असल्याने तो सीमारेषेपार जाईल असेच सगळ्यांना वाटले होते. मात्र पंतनी हवेत सूर मारत अप्रतिम झेल घेतला. एका हाताने त्याने घेतलेला हा झेल पाहून गोलंदाजी करत असलेल्या सिराजसह सगळेच संघ सहकारी खुश झाले.

इशांत शर्मा याच्या गोलंदाजीवर पंत यानं जॅक लीच याचा अप्रितम झेल घेत दिवसभरातील दुसऱ्यांदा टीकाकारांची तोंडं बंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 4:11 pm

Web Title: do not miss catch marvel pant ind vs eng nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 IND vs ENG: अनुभवी अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचे लोटांगण
2 Video: हवेत झेप घेत अजिंक्यने घेतलेला भन्नाट झेल पाहिलात का?
3 Video: इंग्लंडच्या मोईन अलीला प्रेक्षकाने विचारला भन्नाट प्रश्न अन्…
Just Now!
X