22 May 2019

News Flash

Conflict of Interest case : पुढील सुनावणीची गरज नाही -लक्ष्मण

लक्ष्मणने लवाद अधिकाऱ्यांकडे दिलेल्या जबाबात आपली भूमिका पूर्णपणे मांडली आहे

नवी दिल्ली : परस्पर हितसंबंध जोपासल्याच्या आरोपाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांना सुनावले असून यापुढे कोणत्याही सुनावणीची गरज नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्यपद आणि सनरायजर्स हैदराबादचा मार्गदर्शक अशा दुहेरी पदांमुळे परस्पर हितसंबंध जोपासले जात असल्याचा आक्षेप त्याच्यावर घेण्यात आला होता. त्यानंतर लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांची लवाद अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली होती. त्यानंतर पुढील सुनावणी २० मे रोजी होणार होती. त्या पाश्र्वभूमीवर लक्ष्मणने हे मत व्यक्त केले असून तक्रारदार संजीव गुप्ता यांनीदेखील अजून सुनावणीची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

लक्ष्मणने लवाद अधिकाऱ्यांकडे दिलेल्या जबाबात आपली भूमिका पूर्णपणे मांडली आहे. याबाबत तक्रारदाराला काही म्हणणे मांडायचे असल्यास, त्याला ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. लवाद अधिकारी जैन यांनी अद्याप त्यांचा निर्णय राखून ठेवला आहे.

First Published on May 16, 2019 3:26 am

Web Title: do not require any further hearing says vvs laxman