News Flash

फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर आणि इतर सहा जणांची चौकशी सुरु

मॅराडोना यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिएगो मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. (Express photo by Partha Paul)

महान फुटबॉलपटू तसेच अर्जेटिनाच्या १९८६च्या फिफा विश्वचषक जेतेपदाचे शिल्पकार दिएगो मॅराडोना यांचे गेल्यावर्षी वयाच्या ६०व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले झाले होते. मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराच्या झटका बसल्याने मॅराडोना यांचे निधन झाले. मात्र आता सात महिन्यांच्या कालावधीनंतर मॅराडोना यांच्या मृत्यूबाबत सरकारी वकीलांनी त्यांच्या वैद्यकीय व नर्सिंग टीमवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. माजी अर्जेटिना फुटबॉलरचे वैयक्तिक चिकित्सक लिओपोल्डो लुक, मानसोपचारतज्ज्ञ अगस्टीना कोसाचोव्ह आणि अनेक परिचारिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मॅराडोना यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारीपासून अर्जेटिनाच्या वकिलांकडून या सात जणांची चौकशी केली जाणार आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या आरोग्याबद्दल माहिती असताना देखील, चुकीची उपचार पद्धती वापरण्यात आली आणि त्यामुळे दिएगो मॅराडोना यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असा आरोप सात जणांवर लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी ६० वर्षीय दिएगो मॅराडोना यांच्या मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराच्या झटका बसल्याने मॅराडोना यांचे निधन झाले झाले होते. मॅराडोना यांच्या शस्त्रक्रियेनंतर बिघडलेल्या प्रकृतीसाठी त्यांच्या पाच मुलांपैकी दोन मुलांनी न्यूरोसर्जन लिओपोल्डो लुक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर हा तपास सुरु करण्यात आला.

नक्की वाचा >> महानायकाचा युगान्त!

तपासासाठी नेमण्यात आली होती समिती

अर्जेंटिनाच्या सरकारी वकिलांनी बोलावलेल्या २० वैद्यकीय तज्ञांच्या समितीने गेल्या महिन्यात मॅरेडोना यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांबाबत अहवाल दिला होता. त्यामध्ये त्यांनी मॅरेडोना यांच्यावर उपचारांची कमतरता आणि अनियमितता होती. वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर लक्ष दिले नाही असे म्हटले होते. योग्य वैद्यकीय सुविधेत पुरेसे उपचार करून मॅरेडोना यांनी जगण्याची चांगली संधी मिळू शकली असती असा पॅनेलने निष्कर्ष काढला होता. त्याऐवजी राहत्या घरीच मॅरेडोना यांचे निधन झाले.

मानसोपचारतज्ज्ञ अगस्टीना कोसाचोव (वय ३५), मानसशास्त्रज्ञ कार्लोस डायझ (२९), परिचारिका रिकार्डो अल्मिरॉन (३७) आणि डाहियाना माद्रिद (३६), नर्सिंग समन्वयक मारियानो पेरोनी (४०) आणि वैद्यकीय समन्वयक नॅन्सी फोर्लिनी (५२) यांच्यावर सध्या मॅरेडोना यांच्या मृत्यूबाबत चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा >> देवत्वाचा शाप!

आरोप सिद्ध झाले तर ८ ते २५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

सोमवारपासून पुढील दोन आठवड्यांपर्यंत ही चौकशी सुरु राहणार आहे. यामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांना वकिलांमार्फत उत्तर देता येणार आहे. अर्जेंटिनामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढल्याने गेल्या महिन्यात सुनावणी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर आता ही सुनावणी पुन्हा सुरु झाली आहे. जर आरोप सिद्ध झाले तर या सर्वांना ८ ते २५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. घरी उपचार घेत असतानाच, बुधवारी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका बसला. डॉक्टरांचे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मॅराडोना यांच्या निधनाच्या बातमीने बुधवारी सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्जेटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बेटरे फर्नाडेझ यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 11:31 am

Web Title: doctors and six others inquiry started for the death of footballer diego maradona abn 97
टॅग : Football
Next Stories
1 विनू मांकड, कुमार संगकारा यांना ICC Hall Of Fame मध्ये स्थान
2 PSL: ‘त्या’ धडकेनंतर फाफ ड्यूप्लेसिसला ‘मेमरी लॉस’चा त्रास; ट्विटरवरुन चाहत्यांना दिली माहिती
3 Euro Cup 2020: अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडची युक्रेनवर ३-२ ने मात
Just Now!
X