06 March 2021

News Flash

देशांतर्गत क्रिकेटची मदार सुरक्षित प्रवासावरच!

‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीचे स्पष्टीकरण

संग्रहित छायाचित्र

 

सुरक्षित प्रवासाची खात्री क्रिकेटपटूंना मिळाली, तरच रणजी करंडक आणि अन्य स्पर्धाचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरू करता येईल, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या साथीमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील स्थानिक क्रिकेट हंगामापुढे अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. करोनाची साथ आली नसती तर २०२०-२०२१चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम ऑगस्टच्या उत्तरार्धात विजय हजारे क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ झाला असता. त्यानंतर रणजी करंडक, दुलीप करंडक आणि मुश्ताक अली करंडक या स्पर्धा क्रमाने झाल्या असत्या. गेल्या हंगामातील इराणी करंडक क्रिकेट स्पर्धासुद्धा टाळेबंदीमुळे रद्द करण्यात आली होती.

‘‘स्थानिक आणि कनिष्ठ गटाचे क्रिकेट हेच देशाचे भवितव्य आहे, परंतु करोनाची साथ आटोक्यात आल्यानंतरच ते शक्य होऊ शके ल. देशाचे क्षेत्रफळ हे जास्त आहे. देशांतर्गत सामन्यांसाठी संघांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागेल. त्यामुळे सुरक्षित प्रवास शक्य होईपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नाही,’’ असे गांगुलीने सांगितले. विविध वयोगटांच्या आणि महिलांच्या क्रिकेट स्पर्धाबाबतही ‘बीसीसीआय’ची हीच भूमिका असेल, असेही ४८ वर्षीय गांगुलीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:13 am

Web Title: domestic cricket depends on safe travel explanation by sourav ganguly abn 97
Next Stories
1 ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षीही अशक्य?
2 Eng vs WI : जेसन होल्डर ठरला विंडीजचा सर्वोत्तम कर्णधार, दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे
3 Eng vs WI : होल्डरचा ‘विक्रमी पंच’, इंग्लंडचा निम्मा संघ केला गारद
Just Now!
X