25 January 2021

News Flash

देशांतर्गत क्रीडा स्पर्धाना लवकरच प्रारंभ -रिजिजू

देशभरातील नामांकित क्रीडा संकुल तसेच स्टेडियम्समध्ये स्पर्धेच्या आयोजनाची जोरात तयारी सुरू आहे

संग्रहित छायाचित्र

 

करोनामुळे भारतातील क्रीडा क्षेत्र गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असले तरी लवकरच देशांतर्गत क्रीडा स्पर्धाना प्रारंभ करण्यात येईल, असा आशावाद केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी केल्यानंतर रिजिजू यांनी क्रीडा क्षेत्राच्या पुनरागमनाबाबत मत मांडले. ‘‘देशातील क्रीडा स्पर्धाना लवकरच सुरुवात करण्यात येईल. यासाठी शासनाने आखलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत असून खेळाडूंच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेतली जाईल. देशभरातील नामांकित क्रीडा संकुल तसेच स्टेडियम्समध्ये स्पर्धेच्या आयोजनाची जोरात तयारी सुरू आहे,’’ असे रिजिजू म्हणाले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून भारतात विविध खेळांच्या सराव शिबिरांना सुरुवात झाली असून यामध्ये हॉकी, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्सचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:08 am

Web Title: domestic sports competitions start soon kiren rijiju abn 97
Next Stories
1 उसेन बोल्टला करोनाची लागण
2 १३ वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ म्हणजे अर्जुन पुरस्कार – इशांत शर्मा
3 IPL स्पॉन्सरशिपमधून Future Group ची माघार
Just Now!
X