News Flash

देशांतर्गत युवा क्रिकेट स्पर्धा जून-जुलैमध्ये

‘‘करोनाकाळातही हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरले आहे.

देशातील करोनाबाबतची परिस्थिती सुधारल्यास युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) मानस आहे. ‘बीसीसीआय’ने या आशयाचे पत्र सर्व राज्य संघटनांना पाठवले आहे.

‘‘या मोसमात ‘बीसीसीआय’ देशांतर्गत क्रिकेटचे अधिकाधिक सामने खेळवण्याच्या विचारात आहे. करोनाचा अडथळा नसल्यास, जुन-जुलै महिन्यात १९ वर्षांखालील स्पर्धा आयोजित केली जाईल,’’ असे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने या पत्रात म्हटले आहे. मात्र भर पावसात या स्पर्धेतील सामने कसे खेळवायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘‘करोनाकाळातही हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरले आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजय तसेच मायदेशात इंग्लंडविरुद्ध मिळवलेले यश कायम स्मरणात राहील. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व स्पर्धा तसेच ‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दिमाखात आयोजन होईल,’’ अशी अपेक्षा गांगुलीने व्यक्त केली.

पंतच्या कामगिरीने गांगुली प्रभावित

नवी दिल्ली : आक्रमक फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीने मी प्रभावित झालो असून तो भारताचा खऱ्या अर्थाने सामना जिंकून देणारा खेळाडू ठरला आहे, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने पंतची स्तुती केली. ‘‘विराट कोहली आणि रोहित शर्माप्रमाणेच पंतची फलंदाजी पाहायला मला आवडते. भारतीय संघात माझे अनेक आवडते खेळाडू आहेत, त्यात आता पंतची भर पडली आहे. पण मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मला एकाचे नाव घेता येणार नाही. भारतात अफाट गुणवत्ता आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांची जागा आता कोहली, रोहित, पंतसारख्या खेळाडूंनी घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही काळात भारतीय संघ जगज्जेत्याच्या थाटात वावरत आहे,’’ असेही गांगुलीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:07 am

Web Title: domestic youth cricket tournament in june july akp 94
Next Stories
1 ..तरीही श्रेयस अय्यरला ‘आयपीएल’चे पूर्ण मानधन
2 कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत योगदानासाठी उत्सुक -उमेश
3 श्रीलंका-विंडीज कसोटी मालिका : विंडीज-श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णीत
Just Now!
X