News Flash

डॉमनिक थिमला विजेतेपद

अंतिम फेरीत डॅनिल मेद्वेद्ेव याच्यावर ६-४, ६-० अशी मात

(संग्रहित छायाचित्र)

बार्सिलोना खुली टेनिस स्पर्धा

ऑस्ट्रियाच्या तिसऱ्या मानांकित डॉमनिक थिमने रविवारी मध्यरात्री एटीपी बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत थिमने रशियाच्या सातव्या मानांकित डॅनिल मेद्वेद्ेवला ६-४, ६-० अशी सहज धूळ चारली.

गेल्या १५ वर्षांत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा थिम हा चौथा टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी राफेल नदाल, केई निशिकोरी आणि फर्नाडो व्हर्डास्को यांनी विजेतेपदास गवसणी घातली आहे. त्याचप्रमाणे १९९६ नंतर प्रथमच ऑस्ट्रियाच्या टेनिसपटूने या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरले. यापूर्वी थॉमस मस्टरने हा पराक्रम केला होता. थिमच्या नावावर आता १३ एटीपी विजेतेपदे जमा आहेत.

पुरुष दुहेरीत कोलंबियाच्या जुआन कॅबल आणि रॉबर्ट फराह या तिसऱ्या मानांकित जोडीने जेमी मरे आणि ब्रुनो सोर्स या दुसऱ्या मानांकित जोडीचा ६-४, ७-६ (७-४) असा संघर्षमय लढतीत पराभव करून विजेतेपद मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:02 am

Web Title: dominican thesis title
Next Stories
1 पृथ्वी आणि माझा दर्जा वेगळा -गिल
2 प्रशासकीय समितीवर लक्ष्मणची आगपाखड
3 पंजाबच्या नावावर IPL मधला लाजिरवाणा विक्रम
Just Now!
X