सचिन तेंडुलकरने निवृत्ती घ्यावी किंवा नाही, याबाबत चर्वितचर्वण सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने या चर्चेचा भडका उडाला आहे, पण ‘पॉन्टिंगने निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी सचिनने तसा निर्णय घ्यायला हवा असे नाही. त्याच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. या दोघांची तुलना करू नये, असे मत भारताचा सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
निवृत्तीसाठी कोणीही कोणावर दबाव टाकत नाही. प्रत्येकाला निवृत्त कधी व्हायचे हे चांगलेच माहिती असते. पॉन्टिंग जर निवृत्तीचा निर्णय घेत असेल तर सचिननेही तसा निर्णय घ्यावा, असे नाही. हे दोघेही भिन्न देशांतले आहेत, त्यामुळे त्यांची तुलना होऊच शकत नाही, असे गंभीर म्हणाला.