News Flash

Ind vs Pak : विजेतेपदाचे दावेदार समजू नका, भारताच्या माजी कर्णधारांनी टोचले विराटसेनेचे कान

२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीतली चूक पुन्हा नको !

भारतासह संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमी रविवारी मँचेस्टरच्या मैदानावर रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी तयार झाले आहेत. कोणत्याही स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला चांगली प्रसिद्धी मिळते. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने प्रत्येकवेळी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी स्वतःला विजयाचा दावेदार समजू नये असं मत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन माजी खेळाडूंनी व्यक्त केलं आहे. ते Star Sports वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होते.

“भारतीय संघाने खूप सावधपणे खेळ करण्याची गरज आहे. आपणच विजयाचे दावेदार आहोत या थाटात संघाने मैदानात उतरु नये. २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला हलकं लेखण्याची चूक केली होती आणि त्याचा फटका संघाला बसला आहे. मात्र हा सामना नक्कीच रंगतदार होईल.” सौरव गांगुलीने आपलं मत व्यक्त केलं.

अवश्य वाचा – Video : भारत-पाक सामन्याचं तिकीट मिळेलं? विराट म्हणतो, घरी बसा आणि टिव्हीवर सामना पाहा…

सौरव गांगुलीचा एकेकाळचा साथीदार सचिन तेंडुलकरनेही सौरवच्या मताशी आपली सहमती दर्शवली. “आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला हलकं लेखण्याची चूक भारत करणार नाही. पाकिस्तान हा नेहमी बेभरवशाचा आणि धोकादायक संघ राहिलेला आहे. आपण आखलेली प्रत्येक रणनिती ही १०० टक्के बरोबर आहे हा आत्मविश्वास डोळ्यासमोर ठेऊनच संघाने पाऊल पुढे टाकायला हवं”, सचिन बोलत होता. त्यामुळे विराटसेना भारताच्या अनुभवी खेळाडूंनी दिलेला सल्ला कितपत पाळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : Ind vs Pak टीम इंडियाचा कसून सराव, पाहा हे खास फोटो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 9:25 pm

Web Title: dont think you are favourite against pakistan says sourav ganguly and sachin tendulkar to india psd 91
Next Stories
1 Video : भारत-पाक सामन्याचं तिकीट मिळेलं? विराट म्हणतो, घरी बसा आणि टिव्हीवर सामना पाहा…
2 World Cup 2019 : ऋषभ पंत टीम इंडियाच्या सरावसत्रात, धोनीने दिल्या टिप्स
3 World Cup 2019 Aus vs SL : कांगारुंची लंकेवर मात, कर्णधार करुणरत्नेची झुंज अपयशी
Just Now!
X