दक्षिण आफ्रिकेचा संघ मंगळवारी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर सरावासाठी दाखल झाला, तेव्हा सर्वाना वेध लागले होते ते वेगवान गोलंदाज डेल स्टेनचे. स्टेनने सराव सत्राला गैरहजेरी लावून दुखापतीतून आपण सावरलो नसल्याचीच जणू ग्वाही दिली. मोहालीतील पहिल्या कसोटीत स्टेनला दुखापत झाली होती.
कायले अ‍ॅबॉट आणि स्टेनने माघार घेतल्यास बदली खेळाडू म्हणून भारतात आलेल्या र्मचट डी लँगे यांनी चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर अतिरिक्त सराव केला. स्टेनने मंगळवारी सराव सत्रात भाग घेतला नाही. याचप्रमाणे गोलंदाजीचे शूजसुद्धा परिधान केले नव्हते.