05 July 2020

News Flash

भारताकडून कसोटी खेळण्याचे स्वप्न -चहल

भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे.

लेगस्पिनर युझवेंद्र चहल

नवी दिल्ली : लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाचा भाग नसला तरी २८ वर्षीय चहलने भारतीय संघाकडून कसोटी खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

‘‘भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे. भारताकडून कसोटी खेळणे हे माझे स्वप्न आहे,’’ असे चहलने सांगितले. जुलै महिन्यात निवड समितीने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चारदिवसीय सामन्यासाठी त्याची निवड केली होती. मात्र रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन या अनुभवी फिरकीपटूंवर मात करून कसोटी संघात स्थान मिळवणे सोपे नाही, याची कल्पना चहलला आहे.

‘‘गेल्या ७-८ वर्षांपासून जडेजा आणि अश्विन यांनी भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे,’’ असे चहलने सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाविषयी चहल म्हणाला की, ‘‘गेल्या वर्षभरातील भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, आम्हाला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे, असे मला वाटते. विश्वचषकाआधी आम्हाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर आयपीएलमध्येही खेळायचे आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2018 2:25 am

Web Title: dream for playing test from india says yuzvendra chahal
Next Stories
1 तुम्हाला खेळण्याचे नव्हे, सामना जिंकण्याचे मानधन मिळते!
2 आफ्रिकेचे पाकिस्तानवर वर्चस्व
3 प्रो कबड्डी लीग : गुजरातच्या विजयामुळे पाटणावर बाद फेरीची टांगती तलवार
Just Now!
X