News Flash

ध्येय साध्य करायचे असेल तर स्वप्न पहायला शिका – रौप्यपदक विजेती श्वेता शेरवेगर

नौकानयन प्रकारात तिने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ भारताला नौकानयन प्रकारात रौप्यपदक मिळवून देणाऱ्या श्वेता शेरवेगरचा सेंट इझाबेल्स हायस्कूल, माझगांव कडून सत्कार करण्यात आला. श्वेता ही सेंट इझाबेल्स हायस्कूलची माजी विद्यार्थीनी आहे. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मार्टा तसेच माध्यमिक विभागाच्या फर्नांडिस यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तू श्वेताला भेट म्हणून देण्यात आल्या. या सत्काराला आजी माजी विद्यार्थीनी व शिक्षक उपस्थित होते.

जीवनात कोणतेही ध्येय साध्य करायचे असेल, तर प्रथम स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोपर्यंत ध्येयपूर्ती होत नाही, तोवर मागे हटू नका, असा मोलाचा संदेश तिने विद्यार्थ्यांना दिला.

श्वेताने शाळेबाबत आदराची भावना व्यक्त केली. ‘प्रत्येक व्यक्तीचा पाया हा शाळेतच घडत असतो. मी देखील अशीच घडले. मी शाळेत होते, तेव्हापासूनच मला खेळाची आवड होती. शालेय कारकिर्दीत माझी शाळेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. नंतर नौकायन प्रकारात कारकिर्द घडवताना माझे सहकारी, प्रशिक्षक, पालक यांच्याकडून मला जो पाठिंबा लाभला व सहकार्य लाभले, त्याबाबत मी साऱ्यांची ऋणी आहे’, असे ती म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 6:47 am

Web Title: dream it first to achieve goals says asian games 2018 silver medal winner sailor sweta shervegar
टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 या ५ कारणांमुळे रोहित शर्मा वन-डे संघाचा कर्णधार बनण्यासाठी सक्षम उमेदवार
2 Asia Cup 2018 Final : विजयी फटका लगावत केदारने केली ‘त्या’ कामगिरीची पुनरावृत्ती
3 Asia Cup 2018 Final : तब्बल ५ वर्षांनी ‘टीम इंडिया’ने केला हा पराक्रम
Just Now!
X