News Flash

टी २० मुंबई लीगमध्येही रंगणार ‘ड्रीम ११’चा थरार

या स्पर्धेत एकूण ८ संघ असून २६ मे रोजी वानखेडे मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे

नुकताच IPL चा हंगाम संपला. मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामन्यात चेन्नईला पराभूत केले आणि चौथ्यांदा किताब जिंकला. या नंतर आता मुंबईमध्ये टी २० लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे IPL मध्ये अधिकृतरीत्या Fantasy Game Partner असणारा ड्रीम ११ आता टी २० मुंबई लीग साठीही अधिकृत Fantasy Game Partner असणार आहे. ड्रीम ११ आणि टी २० मुंबई लीग यांच्यात ४ वर्षांचा करार करण्यात आला आहे. २०१८ साली या लीगचा पहिला हंगाम दणक्यात पार पडला. यंदा टी २० मुंबई लीगचा दुसरा हंगाम आहे.

गेल्या हंगामात टी २० मुंबई लीगमध्ये चाहत्यांनी अनेक धमाकेदार सामने पहिले. या सामन्यांच्या माध्यमातून अनेक नवे आणि युवा खेळाडू चाहत्यांचे लाडके झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामात या स्पर्धेबरोबरच चाहत्यांना आपले लाडके खेळाडू देखील ड्रीम ११ च्या माध्यमातून निवडण्याची आधी मिळणार आहे. या लीगमध्ये एकूण २३ सामने होणार आहेत. त्यामुळे ड्रीम ११ च्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या मित्रांशी या २३ सामन्यांसाठी हा खेळ खेळता येणार आहे.

या लीगचे सर्व सामने वानखेडे मैदानावर होणार आहेत. करारानंतर बोलताना ड्रीम ११ चे प्रवक्ते म्हणाले की या स्पर्धेशी संलग्न झाल्यामुळे आणि त्यांचे अधिकृत Fantasy Game Partner झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ खेळत असून ४-४ संघांचे २ गट करण्यात आले आहेत. २६ मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 3:38 pm

Web Title: dream11 becomes the official fantasy game partner for t20 mumbai league
Next Stories
1 इगोर स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक
2 कुलदीपने प्रसारमाध्यमांना झापले, धोनीबद्दलच्या व्यक्तव्याचा विपर्यास
3 अनुभवाच्या जोरावर पंतऐवजी कार्तिकला विश्वचषक संघात स्थान !
Just Now!
X