जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा

खान्ती मॅन्सिस्क (रशिया)

रशियाच्या माजी विजेत्या अ‍ॅलेक्झांडर कॉस्टेन्यूककडून ‘टाय-ब्रेक’मध्ये २.५-१.५ असा पराभव पत्करल्यामुळे ग्रँडमास्टर डी. हरिकासह भारताचे जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या ‘टाय-ब्रेकर’पर्यंत हरिकाने भारतीय आव्हानाची धुरा समर्थपणे वाहिली. मात्र पहिल्या डावातील जलदगती ‘टाय-ब्रेक’मध्येच तिला धक्का बसला. या डावात दोन्ही खेळाडूंना खेळण्यासाठी २५ मिनिटांचा वेळ उपलब्ध होता, परंतु परतीच्या सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना हरिकाने जोरदार पुनरागमन केले आणि विजयासह १-१ गुणांची बरोबरी साधली.

मग १० मिनिटांच्या डावात हरिकाने काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना पहिला डाव गमावला. त्यामुळे दुसऱ्या डावात हरिकाला पांढऱ्या मोहऱ्यांनिशी विजयाची नितांत आवश्यकता होती, परंतु तिला बरोबरी साधता आली.