News Flash

Dubai BWF World Super Series Final: रोमहर्षक सामन्यात सिंधूचा निसटता पराभव

जपानच्या यामागुचीने केला पराभव

सिंधूची अंतिम फेरीत धडक

दुबई बॅडमिंटन वर्ल्ड सुपर सीरिजचा अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. जपानच्या अकाने यामागुचीकडून भारताच्या पी व्ही सिंधूचा निसटता पराभव झाला. यामागुचीने सिंधूचा २१-१५, १२-२१, १९-२१ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सिंधूने वर्चस्व राखले होते. तिने २१-१५ असा एकतर्फी सेट जिंकला. पण विजयाचा हा धडाका तिला पुढे कायम ठेवता आला नाही. तिने जपानी स्पर्धकाला कडवी झुंज दिली. परंतु, थकलेल्या सिंधुचा यामागुचीने योग्यवेळी फायदा उठवला व पुढचे दोन्ही सेट अत्यंत कमी फरकाने जिंकले.

विशेष म्हणजे साखळी फेरीत सिंधूने यामागुचीचा पराभव केला होता. सिंधूने विजय मिळवला असता तर ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली असती. यापूर्वी सायना नेहवाल या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सिंधूने यापूर्वी इंडिया ओपन सुपर सीरिज आणि कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर नाव कोरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 5:43 pm

Web Title: dubai bwf world super series finals sindhu loses against akane yamaguchi
Next Stories
1 Live Cricket Score Ind vs Sl 3rd ODI: श्रेयसपाठोपाठ शिखरचीही अर्धशतकी खेळी
2 ‘खडूस’ मुंबईची ससेहोलपट
3 भारताचा मालिका विजयाचा निर्धार
Just Now!
X