लॉकडाउनपश्चात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाच्या पाठीमागचं दुखापतीचं ग्रहण काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीये. सिडनीच्या मैदानावर पहिल्या वन-डे सामन्याआधी भारतीय संघात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. संघाचा युवा गोलंदाज नवदीप सैनीला दुखापत झाल्यामुळे बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून टी.नटराजनला संघात स्थान दिलं आहे.
गुरुवारी रात्री बीसीसीआयने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती दिली.
नवदीप सैनीला पाठीचं दुखणं बळावल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 8:26 am