News Flash

लोकेश राहुलचा ‘दुहेरी धमाका’

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलने दुसऱ्या डावातही शतक झळकावत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागाच्या विजयाचा पाया रचला. दोन्ही डावांमध्ये शतकाला गवसणी घालत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी

| November 2, 2014 03:02 am

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलने दुसऱ्या डावातही शतक झळकावत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागाच्या विजयाचा पाया रचला. दोन्ही डावांमध्ये शतकाला गवसणी घालत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी राहुलने आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
दुसऱ्या डावात ४ बाद २१४वरून पुढे खेळणाऱ्या मध्य विभागाच्या डावाला आधार दिला तो रॉबिन बिश्तच्या शतकाचा. मध्य विभागाचा डाव ४०३ धावांत आटोपला. रॉबिन बिश्तने ८ चौकार व ४ षटकारांसह ११२ धावा केल्या. दक्षिण विभागातर्फे श्रेयस गोपाळने ४ बळी घेतले. विजयासाठी ३०१ धावांचे लक्ष्य मिळालेल्या दक्षिण विभागासाठी राहुलने आणखी एक शतक नोंदवले. ९६ धावांच्या सलामीनंतर रॉबिन उथप्पा ३० धावांवर बाद झाला. यानंतर राहुलला साथ मिळाली बाबा अपराजितची. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल १२१ तर अपराजित ३० धावांवर खेळत आहेत. सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी दक्षिण विभागाला ११७ धावांची गरज असून त्यांचे नऊ फलंदाज बाकी आहेत.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 3:02 am

Web Title: duleep trophy final ton up rahul puts south on verge of victory
Next Stories
1 मालिका विजयाकडे पाकिस्तानची वाटचाल
2 आधुनिक खेळामध्ये मानसशास्त्राची भूमिका निर्णायक -पंकज अडवाणी
3 युनूसचे शानदार द्विशतक!
Just Now!
X