News Flash

नेयमारचे प्राधान्य ऑलिम्पिक -डुंगा

केवळ कोपा अमेरिका स्पध्रेत न खेळण्याच्या अटीवर बार्सिलोना ही सूट देण्याची शक्यता आहे.

कोपा अमेरिका स्पध्रेपेक्षा रिओ ऑलिम्पिकला अव्वल आघाडीपटू नेयमार प्राधान्य देईल, असे मत ब्राझीलचे प्रशिक्षक डुंगा यांनी व्यक्त केले. कोपा अमेरिका आणि ऑलिम्पिक स्पर्धा लागोपाठ होत आहेत आणि या दोन्ही स्पध्रेत खेळण्याचे मत नेयमारने व्यक्त केले होते. त्यावर अनेक वादविवाद झाले.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) स्पर्धा वेळापत्रकात कोपा अमेरिका स्पध्रेचा समावेश असून बार्सिलोना क्लब नेयमारला त्या काळात सूट देणे भाग आहे. दरम्यान, ऑलिम्पिक स्पध्रेसाठी नेयमारला सूट देण्यास बार्सिलोनाचा काही आक्षेप नाही. मात्र केवळ कोपा अमेरिका स्पध्रेत न खेळण्याच्या अटीवर बार्सिलोना ही सूट देण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पुढील निर्णय नेयमारने घ्यायचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 4:05 am

Web Title: dunga wants neymar at olympics rather than copa america
Next Stories
1 भारताला पराभूत करणं कठीण- केन विल्यमसन
2 भारत-पाकिस्तान सामना धरमशालाऐवजी कोलकात्यात
3 मला भारताचा जॅक कॅलिस व्हायचयं- हार्दिक पंड्या
Just Now!
X