06 December 2019

News Flash

राष्ट्रीय विक्रमासह द्युती चंद उपांत्य फेरीत

२३ वर्षीय द्युतीने ११.२८ सेकंदांची वेळ देत १०० मीटरची चौथी शर्यत जिंकली.

द्युती चंदने महिलांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडत आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. परंतु महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत हिमा दासला पाठदुखीचा त्रास झाल्याने स्पर्धा अर्धवट सोडून द्यावी लागली आहे.

२३ वर्षीय द्युतीने ११.२८ सेकंदांची वेळ देत १०० मीटरची चौथी शर्यत जिंकली. गुवाहाटी येथे गेल्या वर्षी प्रस्थापित केलेला ११.२९ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम तिने मोडला. मात्र जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आवश्यक असलेली ११.२४ सेकंदांची वेळ तिला गाठता आली नाही.

४०० मीटर शर्यतीच्या पात्रता फेरीत भारताची एम.आर.पूवम्मा हिने दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली. बहारिनच्या सालवा नासेरने पहिला क्रमांक मिळवला. परंतु हिमाला ऐन स्पर्धेतच पाठदुखीचा त्रास वाटू लागल्याने तिला शर्यत पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ती अंतिम फेरीसाठी पात्रच होऊ शकली नाही.

First Published on April 22, 2019 1:42 am

Web Title: dutee chand
Just Now!
X