13 December 2017

News Flash

VIDEO: ‘चॅम्पियन’नंतर ब्रावो घेऊन येतोय कोहली, धोनीवरील धम्माल गाणं

ब्रावोचं गाणं ऐकून डॅरेन खळखळून हसला.

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: April 21, 2017 6:35 PM

ब्रावो सध्या धोनी आणि कोहलीवर तयार केलेल्या गाण्याची तयारी करत आहे

‘चॅम्पियन’ गाण्याने सर्वांना थिरकण्यास भाग पाडणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो आता आणखी एक गाण घेऊन येतोय. क्रिकेटच्या मैदानासोबतच ब्रावोने गायनाचेही क्षेत्र गाजवले. पहिल्याच गाण्यातून डीजे ब्रावो अशी ओळख प्राप्त केलेल्या या हरहुन्नरी खेळाडूने यावेळ आपलं नवं गाणं भारतीय क्रिकेटच्या दोन महान खेळाडूंवर तयार केलं आहे. ब्रावो सध्या धोनी आणि कोहलीवर तयार केलेल्या गाण्याची तयारी करत आहे. लवकरच तो हे गाणं रेकॉर्ड करून प्रदर्शित करणार असल्याचं समजतं. ब्रावो सध्या दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळू शकत नाहीय. त्यामुळे मिळालेल्या वेळात त्याने धोनी आणि कोहलीला समर्पित गाणं तयार केलं आहे.

गुजरात लायन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या गाण्याची झलक देणांर ट्विट पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये ड्वेन ब्रावो सामना झाल्यानंतर त्याचा भाऊ डॅरेन ब्रावो याच्यासोबत गप्पा मारताना दिसतो. त्यावेळी ब्रावोने आपल्या नव्या गाण्याची झलक सादर केली. ब्रावोचं गाणं ऐकून डॅरेन खळखळून हसला.

”वी गो ओवर टू इंडिया..इंडिया..इंडिया..आय कॉल अप अ बॉय नेम्ड कोहली..कोहली..कोहली..वी टेल हिम टू व्हॉट्सअप धोनी..धोनी”, असे ब्रावोच्या नव्या गाण्याचे बोल आहेत.

ड्वेन ब्रावोचं ‘चॅम्पियन चॅम्पियन’ हे गाणं खूप गाजलं होतं. ब्रावोच्या गाण्याचा एक अल्बम देखील प्रकाशित करण्यात आला होता. वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्याननंतर ब्रावोच्या गाण्याला तुफान पसंती मिळाली होती. ब्रावोला बॉलीवूडची आवड असून अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत काम करण्याची त्याची इच्छा आहे. संधी मिळाली तर दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटात काम करायला आवडेल, असे ब्रावो याआधीही म्हणाला होता. ब्रावो टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘नच बलिये’ या रिआलिटी डान्स शोमध्ये सहभागी देखील झाला होता. ‘चॅम्पियन’ गाण्याच्या मेजवानीनंतर त्याचे चाहते आता नव्या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

First Published on April 21, 2017 6:34 pm

Web Title: dwayne bravo news song on virat kohli and mahendrasingh dhoni