विश्वचषक स्पर्धेच्या संघातून डावलल्यानंतर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर २०१०पासून ब्राव्होने कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ब्राव्होला संघात स्थान देण्यात आले नव्हते, त्यानंतर विश्वचषकाच्या संघातही त्याचे नाव नव्हते. ब्राव्होने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. ब्राव्होने वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाबरोबर मोठय़ा कालावधीसाठी करार केला असून तो ट्वेन्टी-२० क्रिकेटही खेळणार आहे.

कसोटी क्रिकेटमधून आज मी निवृत्त होत आहे. हा निर्णय मी क्रिकेट मंडळाला कळवला असून यापुढे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
– ड्वेन ब्राव्हो