25 September 2020

News Flash

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० लढतीबाबत कमालीची उत्सुकता

भारताने इंग्लंडविरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमावली असली, तरी गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर गुरुवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० लढतीबाबत क्रिकेट

| December 19, 2012 08:02 am

भारताने इंग्लंडविरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमावली असली, तरी गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर गुरुवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० लढतीबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या स्टेडियमवर होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. तसेच पुण्यातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना असल्यामुळे चाहत्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी या स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर तेथे आजपर्यंत आयपीएलचे नऊ सामने आयोजित करण्यात आले आहेत. नेहरू स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करणे बंद झाल्यामुळे येथील क्रिकेट चाहत्यांना आंतरराष्ट्रीय सामन्याची प्रतीक्षा होती. भारत व इंग्लंड यांच्यात यापूर्वी २००५ मध्ये एक दिवसाचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये भारताची सरशी झाली होती.
गतवर्षी आयपीएल स्पर्धेतील सामन्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. गुरुवारी होणाऱ्या ट्वेन्टी-२० लढतीसही असाच प्रतिसाद अपेक्षित आहे. स्टेडियमची क्षमता ३९ हजार प्रेक्षकांची असून आतापर्यंत ८५ टक्के तिकिटे विकली गेली आहेत. ७५०, १५०० व २ हजार रुपयांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. ३ हजार, ५ हजार, १० हजार, १५ हजार व २० हजार रुपयांची थोडीच तिकिटे शिल्लक असून बुधवार सायंकाळपर्यंत सर्व तिकिटे विकली जातील अशी अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 8:02 am

Web Title: eagerness regarding india england twenty 20 fight
टॅग Sports
Next Stories
1 शिखर धवनचे शानदार शतक; दिल्लीचा महाराष्ट्रावर विजय
2 भारत दौऱ्यावर जाणे आता अधिक सोपे -बॉयकॉट
3 इंग्लिश संघाच्या शिकण्याच्या व आत्मसात करण्याच्या वृत्तीचे फ्लॉवरकडून कौतुक
Just Now!
X