जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी मार्च महिना हा तितकासा चांगला जाताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी रोनाल्डोच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे, तिला भेटण्यासाठी तो पोर्तुगालमध्ये दाखल झाला होता. यानंतर जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, रोनाल्डोने Maderia बेटावरील आपल्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोनाल्डोने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सर्व चाहत्यांना काळजी घेण्याचीही विनंती केली.

मात्र रोनाल्डो राहत असलेल्या बेटावरच आता भुकंपाचे सौम्य झटके बसले आहेत. रविवारी सकाळी ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. Maderia बेटापासून अवघ्या ४९ कि.मी. अंतरावर असलेल्या Funchal भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. Maderia व्यतिरीक्त Lisbon आणि Canary बेटांवरही भूकंपाचे झटके बसले आहेत. मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही.

अवश्य वाचा – करोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोकडून हॉटेल्सचं रुपांतर हॉस्पिटलमध्ये?? जाणून घ्या काय आहे सत्य…

दरम्यान काही दिवसांपूर्वी, रोनाल्डो करोनाग्रस्तांसाठी आपल्या हॉटेल्सचं हॉस्पिटलमध्ये रुपांतर करणार अशी बातमी आली होती. मात्र त्याच्या कर्मचाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. “आम्ही नेहमीप्रमाणे हॉटेल चालवतोय, हॉटेलचं रुपांतर हॉस्पिटलमध्ये होणार नाहीये. आमच्यासाठी इतर दिवसांप्रमाणेच हा दिवस आहे. अनेक प्रसारमाध्यमांचे आम्हाला फोन आले”.. असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.