News Flash

ईडी कोवनचे चॅपेलना प्रत्युत्तर

चेन्नई तसेच हैदराबाद कसोटीत सुमार प्रदर्शन केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी सलामीवीर ईडी कोवान याच्यावर जोरदार टीका केली होती. चॅपेल यांच्या टीकेला कोवनने

| March 17, 2013 03:01 am

चेन्नई तसेच हैदराबाद कसोटीत सुमार प्रदर्शन केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी सलामीवीर ईडी कोवान याच्यावर जोरदार टीका केली होती. चॅपेल यांच्या टीकेला कोवनने आपल्या बॅटनेच प्रत्युत्तर दिले आहे.
‘‘कसोटी खेळण्यासाठी मी सक्षम नाही, या चॅपेल यांच्या वक्तव्याकडे मी फारसे लक्ष दिले नाही. मी भरपूर धावा करणार आहे. चॅपेल यांच्या संघात स्थान मिळेल, असे मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे मत असते. हे मत व्यक्त करणाचा प्रत्येकाला अधिकार असतो. त्यांनी व्यक्त केलेले मत हे सत्य ठरू शकत नाही,’’ असे कोवनने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘चेन्नई आणि हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर माझ्या फलंदाजीवर मी प्रचंड मेहनत घेतली. माझ्या कामगिरीचे मी अवलोकन केले. कोणत्या चुकांमुळे मी बाद होत आहे, याचा सविस्तर अभ्यास केला. यामुळेच मोहाली कसोटीत पहिल्या डावात मी चांगली खेळू करू शकलो. मला संघात स्थान मिळाले आणि या संधीचा मी फायदा उठवला.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 3:01 am

Web Title: eddie cowan jabber to chappel
टॅग : Sports
Next Stories
1 हेराथसमोर बांगलादेशची घसरगुंडी
2 मलेशियाने भारताला २-२ने बरोबरीत रोखले
3 मँचेस्टर सिटीवर एव्हरटनचा विजय
Just Now!
X