आशिया चषक स्पर्धेमुळे सध्या भारत आणि आशिया खंडात क्रिकेटच्या चर्चा रंगल्या आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे साऱ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष हे या सामन्याकडे असणार आहे. पण या क्रिकेट सामन्यांच्या तोडीस तोड प्रसिद्धी मिळवत आहे ती म्हणजे फुटबॉल जगतातील कार्बाओ कप स्पर्धा. फुटबॉल विश्वातील अनेक लोकप्रिय क्लब यात सहभागी झाले असून त्यापैकी लिव्हरपूल आणि चेल्सी या दोन संघामध्ये एका सामना खेळवण्यात आला.

या सामन्यात एडन हजार्डने मारलेल्या गोलमुळे क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचे जणू पारणे फिटले. अतिचपळ अशा पद्धतीने त्याने फुटबॉलवर ताबा मिळवला आणि त्यानंतर त्याने शिताफीने गोल झळकावला. ज्या पद्धतीने हजार्डन दोन खेळाडूंच्या मधून चेंडू काढला आणि गोल केला, ती पद्धत लाजवाब होती.

त्याच्या या गोलची साऱ्यांनीच प्रशंसा केली. सोशल मीडियावर तर त्याचा हा गोल पाहून अनेक नेटिझन्सने आश्चर्याने थक्क झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, हा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. या सामन्यात चेल्सीने लिव्हरपूरवर २-१ असा विजय मिळवला. चेल्सीचा संघ या सामन्यात पिछाडीवर होता. लिव्हरपूलकडे १-० अशी अगदी होती. पण अखेर चेल्सीने सामना जिंकला.