News Flash

फॉर्म्युला-वनच्या मोसमात आठ शर्यती!

ऑस्ट्रियन ग्रां. प्रि. शर्यतीद्वारे ५ जुलैपासून फॉर्म्युला-वनचा हंगाम सुरू होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

 

फॉर्म्युला-वनच्या यंदाच्या मोसमातील अनेक शर्यती करोनामुळे रद्द करण्यात आल्या असून आता आठ शर्यतींच्या मोसमाला जुलै महिन्यात सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रियन ग्रां. प्रि. शर्यतीद्वारे ५ जुलैपासून फॉर्म्युला-वनचा हंगाम सुरू होणार आहे.

स्पाएलबर्ग येथील रेड बुल रेसिंग रिंगवर ५ जुलै रोजी शर्यत झाल्यानंतर त्याच सर्किटवर १२ जुलै रोजी दुसरी शर्यत रंगणार आहे. हंगेरी येथे १९ जुलै रोजी शर्यत होणार असून सिल्व्हरस्टोन येथे २ आणि ९ ऑगस्ट रोजी ब्रिटिश ग्रां. प्रि. शर्यती होतील. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी स्पेनमध्ये तर ३० ऑगस्ट रोजी बेल्जियममध्ये शर्यती होतील. ६ सप्टेंबर रोजी इटलीत होणाऱ्या शर्यतीद्वारे फॉर्म्युला-वनच्या यंदाच्या मोसमाची सांगता होईल.

‘‘गेले दोन महिने फॉर्म्युला-वन प्रशासन सर्व साथीदार, आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल संघटना (फिया) त्याचबरोबर १० संघांच्या मालकांसोबत सुधारित वेळापत्रक तयार करण्यासाठी कसून मेहनत घेत होते. सुरक्षिततेचे तंतोतंत पालन करत पुन्हा सर्किटवर उतरण्याचा आमचा मानस होता,’’ असे ‘फिया’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘‘करोनाच्या संकटाशी संपूर्ण जग दोन हात करत असून आम्ही येत्या काही आठवडय़ांत अधिक सविस्तरपणे वेळापत्रकाची आखणी करणार आहोत. शर्यतीसाठी प्रेक्षकांना अनुमती देण्यात येणार नाही. सुरुवातीच्या काही शर्यती बंद दाराआड खेळवण्यात येतील. मात्र आरोग्यविषयक परिस्थिती सुधारल्यानंतर चाहत्यांना सर्किटमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्याबाबत विचार के ला जाईल. आता आठ शर्यतींसह सर्व संघ तसेच चालक आपला जलवा दाखवण्यासाठी उत्सुक आहेत,’’ असेही या पत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:01 am

Web Title: eight races in formula one season
Next Stories
1 राणी, मनिका, विनेशची ‘खेलरत्न’साठी शिफारस
2 सामन्यांसाठी चार टप्प्यांत सराव!
3 जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुन:श्च हरिओम?? इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर
Just Now!
X