05 March 2021

News Flash

नाबाद १०७, सर्वात वृद्ध महिला क्रिकेटपटू अजुनही करतात योगासनं

अॅश यांचा फिटनेस भल्याभल्यांना थक्क करणारा

जगातल्या सर्वात वृद्ध महिला क्रिकेटपटू अशी ओळख असलेल्या इंग्लंडच्या एलिन अॅश यांनी आज वयाच्या १०७ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. १९११ साली अॅश यांचा जन्म झाला, यानंतर १९३७ साली त्यांनी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गेली ३० वर्ष एलिन नियमीत योगासनं करत आहेत. आजच्या खास दिवशी आयसीसीने एलिन यांचा योगासनं करतानाचा व्हिडीओ ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अॅश यांनी ७ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं. या सामन्यांमध्ये अॅश यांनी २३ च्या सरासरीने १० बळीही घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 8:11 pm

Web Title: eileen ash the oldest living test cricketer turns 107 today
Next Stories
1 सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीला अल्प प्रतिसाद, प्रेक्षकसंख्या घटल्याची माहिती
2 सचिनने किती धावा काढल्या व किती मॅचफिक्सींग केलं? राजू शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य
3 Video : विंडीजविरुद्ध सामन्यात धोनीचं वेगवान स्टम्पिंग पाहिलंत का?
Just Now!
X