भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात शानदार शतक ठोकल्यानंतर विराट कोहली १२३ धावांवर बाद झाला. २५७ चेंडूंची खेळी करताना विराटने १३ चौकार आणि एक षटकार मारला. विराटला खेळी एका वादग्रस्त निर्णयामुळे तंबूत परतावे लागले. पेट कमिन्सन फेकलेल्या ९३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर विराट कोहली ड्राइव्ह मारण्याच्या नादात झेलबाद झाला. बॅटची कडा लागून चेंडू स्लीप्समध्ये उभा असणाऱ्या पीटर हँड्सकॉम्बने झेलला. झेल घेतल्यानंतर पीटरने झेल योग्य असल्याचे सांगताना बाद असं सांगत हातही वर करुन पंचांना खुणावले. पंचांनीही विराटला बाद दिल्यानंतर तिसऱ्या पंचाचांना निर्णय घेण्याचे ठरवले. मैदानावरील पंचानी बाद देताच कोहलीने DRS चा आधार घेतला. त्यात चेंडू हँड्सकॉम्बच्या हातात पडण्याआधी जमिनीवर आदळल्याचे काही अंशी दिसत होते. पण मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राखण्यात आला आणि कोहली तंबूत परतला. पंचांच्या या निर्णयाचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने समर्थन केले. मात्र कोहलीच्या अशा अचानक बाद होण्याचा फटका भारताला बसला आणि ऑस्ट्रेलियाला ४३ धावांची आघाडी मिळाली.

दिवसभर नेटकऱ्यांनी यावरून पंचांना तसेच रडीचा डाव खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला ट्रोल केले. तर दुसरीकडे विराटच्या डोक्यातही हा वादग्रस्त निर्णय तसाच होता हे सरावादरम्यान दिसून आले. सरावादरम्यान विराटकडे कोणीतरी चेंडू झेलण्यासाठी फेकला. विराटने झेप घेऊन तो पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो चेंडूपर्यंत पोहचू न शकल्याने झेल सुचला. तरीही विराटने हसत हसत तो पडलेला चेंडू हातात घेऊन आपण झेल टिपल्याचे आपल्या कृतीतून दाखवले. पीटर हँड्सकॉम्बने ज्याप्रकारे वादग्रस्त झेल हा योग्य असण्यासाठी हात वर करुन बाद असल्याचे सांगितले तसेच काहीसे विराटने केल्याचे या सरावादरम्यान दिसून आले. या कृतीतून अप्रत्यक्षरित्या विराटने रडीचा डाव खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला टोमणाच मारला. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
Shreyas Iyer
कोलकाताचा सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न! आज दिल्ली कॅपिटल्स संघाशी गाठ; श्रेयस, पंतकडे लक्ष
ipl 2024 royal challengers bangalore vs lucknow super giants match 15 preview
IPL 2024 : कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष! रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसमोर आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान

दरम्यान आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भराताला विजयासाठी १७५ धावांची गरज असून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी पाच विकेट्सची गरज आहे. उद्याचा कसोटीचा अंतिम दिवस निर्णयाक ठरणार असून सामना जिंकण्यासाठी किंवा अनिर्णित ठेवण्यासाठी भारतीय फलंदाजांना मैदानात पाय रोवून उभे रहावे लागणार आहे.