ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने अखेरीस सरावाला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात महिला टी-२० विश्वचषकादरम्यान एलिस पेरीला स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं. तब्बल ५ महिने मैदानापासून दूर राहिलेल्या पेरीने वर्कआऊट सुरु केलं आहे. धडाकेबाज खेळासोबत आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असलेल्या एलिस पेरीने चाहत्यांसाठी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या दुखापतीमुळे एलिस पेरी अनेक महत्वाचे सामने खेळू शकली नव्हती. भारतीय महिलांविरोधातला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामनाही पेरी खेळू शकली नाही. एलिस पेरी ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहरात राहते. मेलबर्न शहरात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. याच कारणासाठी आयसीसीने ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक रद्द केला आहे. ४ महिन्यांच्या लॉकडाउननंतर आयसीसीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली आहे. परंतू अद्याप महिला क्रिकेट सामने सुरु झाले नाहीयेत. त्यामुळे एलिस पेरी पुन्हा मैदानात कधी दिसणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

अवश्य पाहा – खेळात नंबर १ आणि दिसण्यातही…जाणून घ्या ५ सुंदर महिला क्रिकेटपटूंबद्दल…