17 January 2021

News Flash

‘टीम इंडिया’च्या स्टार खेळाडूला एलिस पेरीसोबत हवी ‘डिनर डेट’

तुम्हाला माहित्येत का एलिस पेरीबद्दलच्या खास गोष्टी

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. या दरम्यान, टीम इंडियाच्या एका फलंदाजाने ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू सौंदर्यवती एलिस पेरी हिच्यासोबत डिनर डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एलिस पेरी : एक सौंदर्यवती, स्टार क्रिकेटपटू अन् Cricketer of the Year

सध्या क्रीडा क्षेत्रातील बहुतांश जण सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. या माध्यमातून ते चाहत्यांशी तसेच आपल्या संघातील सहकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. भारताचा फलंदाज मुरली विजय यानेही इस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत चाहत्यांशी संवाद साधला आणि आपले करियर व आयुष्यासंदर्भातील अनेक खास गोष्ट शेअर केल्या. या लाईव्हमध्ये मुरली विजयला ‘तुला कोणासोबत डिनरला जाण्यास आवडेल?’ असा प्रश्न एकाने विचारला. यावर त्याने पहिले नाव घेतले शिखर धवनचे घेतले. पण दुसरे नाव मात्र एका महिला क्रिकेटपटूचे घेतले. तो म्हणाला की ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी हिच्याबरोबर डिनरला जायला आवडेल.

या लाईव्ह चॅटमध्ये मुरली विजयने भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा आपला आवडता फलंदाज असल्याचे सांगितले. तसेच वसीम जाफर आणि गौतम गंभीर यांचीही फलंदाजीची शैली आवडते असे सांगितले. या तिघांच्या फलंदाजीतून मी खूप काही शिकलो, असे विजयने नमूद केले. याशिवाय, पुढे तो म्हणाला की २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात भारताचे चार बळी गेले होते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीने संयमी खेळी करत डाव सावरला होता हे मला कायम लक्षात राहिल, असे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 10:12 am

Web Title: ellyse perry team india murali vijay dinner date amid covid 19 coronavirus lockdown live vjb 91
Next Stories
1 ट्वेन्टी-२० विश्वचषक होणारच!
2 धोनीच्या सांगण्यावरून गुडघ्याच्या दुखापतीसह २०१५च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळलो!
3 ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेला नेमबाजांची पसंती
Just Now!
X